धोनीचा 'तो' कानमंत्र हार्दिकसाठी ठरला करिअरचा यु टर्न

hardik pandya with ms dhoni
hardik pandya with ms dhoniesakal

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याने शुक्रवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 चौथ्या सामन्यात भारताच्या विजयाच मोलाचा वाटा उचलला. पांड्याने तडाखेबाज 46 धावांची खेळी केली. जी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या सामन्यानंतर पांड्याने त्याच्या यशाचे श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला दिले आहे. त्याने दिलेला कानमंत्र माझ्या करिअरचा यु टर्न ठरला असल्याचा खुलासा केला आहे.

hardik pandya with ms dhoni
विराटला टक्कर देण्यासाठी संघात आला 'हा' बलाढ्य खेळाडू

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना भारताने तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या सामन्यानंतर मॅचमध्ये महत्त्वाची खेळी करणाऱ्या कार्तिक आणि पांड्या जोडीने एकमेकांशी संवाद साधला. यावेळी हार्दिकने धोनीने दिलेल्या एका महत्त्वाच्या सल्ल्याबाबत खुलासा केला.

हार्दिकने धोनीला एक प्रश्न विचारला होता की, सामन्यादरम्यान येणाऱ्या तणावातून कसं मुक्त व्हायचं, याचं उत्तर देताना धोनी म्हणाला होता, 'फार सोपं आहे खेळताना स्वत:च्या नाही तर संघाच्या धावसंख्येचा विचार करायचा. धोनीच्या या एका वाक्याने माझं क्रिकेटर म्हणून आयुष्यच बदललं", असा किस्सा हार्दिकने सांगितला.

धोनी त्या दिवशी जे काही बोलला ते मला खूप आवडले. धोनीचं ते वाक्य माझ्या डोक्यात पक्क बसलं आणि मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो. त्यामुळे मी आता ज्या प्रकारचा क्रिकेटर आहे, त्यात धोनीचा खूप मोठा वाटा आहे. आता मी कोणत्याही क्रमांकावर खेळायला मैदानात गेलो तरी मी खेळाचा आणि सामन्याचा अंदाज घेतो. मग मी माझ्या फलंदाजीची रणनिती ठरवून त्या प्रमाणे खेळतो", असेही हार्दिकने स्पष्ट केलं.

hardik pandya with ms dhoni
IND v SA: निर्णायक सामन्यात पावसाचे विघ्न?

यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com