देशात कोणाकडेच नाही अशी कार घेतली धोनीने!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नव्या कोऱ्या कारचे आगमन झाले आहे. सध्या तो निम लष्करी दलासह जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असतानाच त्याच्या घरी त्याच्या फेव्हरेट गाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्याची पत्नी साक्षीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत म्हटले आहे. 

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नव्या कोऱ्या कारचे आगमन झाले आहे. सध्या तो निम लष्करी दलासह जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असतानाच त्याच्या घरी त्याच्या फेव्हरेट गाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्याची पत्नी साक्षीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत म्हटले आहे. 

धोनीच्या घरी Track Hawk 6.2 Hemi या गाडीचे आगमन झाले आहे. धोनीने घेतलेली ही गाडी भारतात अजून कोणाकडेच नाही. सर्वप्रथम धोनीनेच ती खरेदी केली आहे. धोनीचे गाड्यांवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच साक्षीला त्याची खूप आठवण येत आहे.  तिने त्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. तसचे माही मला तुझी खूप आठवण येत  आहे, असेही कॅप्शन दिले आहे. 

दरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी खूप मोठा मान मिळणार आहे. 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये स्वातंत्र्यदिनामिनित्त आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकाविण्याची दाट शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni bought a brand new Track Hawk 6.2 Hemi car