Video : धोनी आणि मंडळींची 'मैफिल-ए-बाथरूम'; व्हिडीओ होतोय व्हायरल!

टीम ई-सकाळ
Thursday, 20 February 2020

सुट्ट्या संपवून धोनी २९ फेब्रुवारीला चेन्नईला जाणार असून १ मार्चपासून तो सरावाला सुरवातही करणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये तो खेळताना दिसणार असून त्यावर त्याचे टीम इंडियातील कमबॅक ठरणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपीएलमध्ये जर धोनी फेल झाला तर त्याच्या निवृत्तीवर आपोआप शिक्कामोर्तब होणार आहे, याची कल्पना त्यालाही आहे. मात्र, सध्या तो आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत सुटी आनंदाने घालवताना दिसत आहे. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

धोनी कधीकधी गाणी गातो, हे त्याच्या चाहत्यांना माहित आहे. याआधीही त्याचे गाणे गातानाचे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरले होते. आताही तो त्याच्या मित्रांसोबत चक्क बाथरूममध्ये गाताना दिसून आला आहे. 

- आशियाई कुस्ती : भारतीयांना तीन ब्रॉंझचाच दिलासा

१ मार्चपासून धोनी चेन्नई सुपरकिंग्ज टीमसोबत सरावाला सुरवात करणार आहे. मात्र, सध्या तो ओन्ली एन्जॉय या मूडमध्ये दिसत आहे. धोनीसोबत टीम इंडियातील पीयूष चावला आणि पार्थिव पटेल हे क्रिकेटपटूही या बाथरूम मैफिलीत सहभागी झाले आहेत. मिस्टर एक्स इन बॉम्बे (१९६४) या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं 'मेरे मेहबूब कयामत होगी' हे गाणं ते गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 

- Video : पाकचा माजी क्रिकेटपटू म्हणतोय, 'या' तिघांनी बदलंल क्रिकेटविश्व!

दरम्यान, बीसीसीआयने धोनीला आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळले असल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर त्याचे कमबॅक ठरेल, असे टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही सांगितले होते. त्यामुळे सुट्ट्या संपवून धोनी २९ फेब्रुवारीला चेन्नईला जाणार असून १ मार्चपासून तो सरावाला सुरवातही करणार आहे. एक महिन्याच्या सरावानंतर तो यंदाच्या आयपीएल हंगामामधील आपली पहिली मॅच कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. 

- INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार आहे, का बरं?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

MS Dhoni Enjoying ' Meri Mehboob Qayamat Hogi ' Song In Bathroom !! . . Video Courtesy: @viralbhayani

A post shared by M S DHONI FC (@captain.dhoni.7) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni enjoys bathroom singing session with Piyush Chawla and Parthiv Patel