Video : माहीचा दिलदारपणा, एअरपोर्टवरील महिला पोलिसांसाठी धोनीचा अनोखा अंदाज

एमएस धोनीचा रांची एअरपोर्ट वरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MS Dhoni Airport
MS Dhoni Airport

MS Dhoni Ranchi Airport : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची फॅन फॉलोइंग काय कमी झाली नाही. धोनी हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. मैदानाबाहेरील त्याचे वर्तन चाहत्यांना खूप आवडते. रांची विमानतळावर महिला पोलिसाशी अतिशय सौम्यपणे बोलताना दिसला. माहीने लाखो लोकांची मन जिंकले आहे. सोशल मीडियावर एमएस धोनीचा रांची एअरपोर्ट वरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

MS Dhoni Airport
Asia Cup 2022 : शमी, सॅमसन आणि इशान बाहेर मात्र 'या' फ्लॉप खेळाडूला संधी

धोनी चेन्नईला 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निघाला होता. यादरम्यान एक महिला पोलीस धोनीसोबत पायरीवर चालताना दिसत आहे. त्याचवेळी धोनी महिला पोलिसाशी बोलतानाही दिसत आहे.व्हिडीओमध्ये धोनीचा बेस्ट फ्रेंड चीतू देखील दिसत आहे. यापूर्वी सोशल मीडियापासून दूर असलेला धोनी अलीकडेच स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिसला होता. ऋषभ पंतच्या इंस्टाग्राम लाइव्हवर फक्त 2 सेकंद दिसताच धोनी लाइमलाइट मध्ये आला होता.

MS Dhoni Airport
Team India : वयाच्या 22 व्या वर्षी 'या' फलंदाजाची कारकीर्द उद्ध्वस्त!

झारखंडचा धोनी पद्म भूषण, पद्म श्री आणि मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित आहे. भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये त्याच्या नावाची गणना केली जाते. धोनीने कर्णधार काळात 2007 आयसीसी टी-20, 2011 क्रिकेट विश्व कप, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आयपीएल 2022 सीएसकेसाठी चांगले नव्हते. आयपीएल 2023 मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com