MS Dhoni Last IPL Match : अखेर ठरलं! CSK चा थला 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

MS Dhoni Last Farewell IPL Match
MS Dhoni Last Farewell IPL Match esakal

MS Dhoni Last Farewell IPL Match : बीसीसीआयने नुकतेच IPL 2023 अर्थात आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएल 2023 ची सुरूवात 31 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र सर्व क्रिकेट चाहत्यांना महेंद्रसिंह धोनी आपला शेवटचा आयपीएल सामना कधी खेळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. धोनी आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएलचा शेवटचा सामना खेळणार आहे.

MS Dhoni Last Farewell IPL Match
PSL Karachi Terrorist Attack : खेळाडूंच्या हॉटेलबाहेर दहशतवादी हल्ला; इंग्लंड, न्यूझीलंडचे खेळाडूंची पाचावर धारण

आयपीएलचा 16 हंगाम हा महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा हंगाम असणार आहे. या हंगामात महेंद्रसिंह धोनी आपला शेवटचा सामना कधी खेळणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने धोनीचा शेवटचा आयपीएल सामना कधी असेल याबाबत माहिती दिली.

अधिकारी म्हणाला की, 'होय महेंद्रसिंह धोनीचा हा यंदाचा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. आतापर्यंत हे सगळ्यांना माहिती देखील झालं आहे. मात्र शेवटी हा त्याचा निर्णय आहे. त्याने आपल्या निवृत्तीबाबत अजून अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही. मात्र आयपीएल चेन्नईत परतली आहे ही बाब सर्व सीएसके फॅन्ससाठी खास असणार आहे. मात्र याचबरोबर धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याने दुःखाची देखील गोष्ट आहे.'

MS Dhoni Last Farewell IPL Match
PSL Naseem Shah : नसीम शाहनेच पाकिस्तान प्रीमियर लीगचा दरिद्रीपणा आणला समोर; Photo व्हायरल

धोनी हा आपला आयपीएल निरोपाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळेल हे जवळपास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा फेअरवेल सामना 14 मे राजी होण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध सीएसकेचा थलायवा शेवटचा सामना खेळले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com