स्वातंत्र्यदिनी धोनी फडकाविणार लेहमध्ये तिरंगा  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी खूप मोठा मान मिळणार आहे. 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये स्वातंत्र्यदिनामिनित्त आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकाविण्याची दाट शक्यता आहे. 

लेह : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी खूप मोठा मान मिळणार आहे. 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये स्वातंत्र्यदिनामिनित्त आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकाविण्याची दाट शक्यता आहे. 

धोनी सध्या क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन निम लष्करी दलासोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत आहे. तो सध्या पुलवामा येथे आहे. आता 10 ऑगस्टला तो लेहला जाणार आहे. 

''धोनी हा भारतीय लष्कराचा ब्रॅंड अॅंबॅसिडर आहे. त्याचे बटालियनमधल्या जवानांबरोबर घनिष्ठ संबंध झाले आहेत. तो त्यांच्याबरोबर फुटबॉल आणि व्हॉलिबॉलही खेळताना आपण पाहिले आहे. तो 15 ऑगस्टपर्यंत काश्मीर खोऱ्यात प्रशिक्षण घेईल.''
- लष्कर अधिकारी

केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मिरच्या प्रत्येक गावात तिरंगा फडकाविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, धोनी नक्की कोणत्या ठिकाणी तिरंगा फडकाविणार हे सष्करांच्या सूत्रांनी सांगतिले नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni likely to unfurl tri-colour in Leh on Independence Day