esakal | धोनीच्या घरात कोरोनाची एन्ट्री; आई-वडील पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Family

धोनीच्या घरात कोरोनाची एन्ट्री; आई-वडील पॉझिटिव्ह

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रांची : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या घरात कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना रांचीमधील बरियातू रोड परिसरातील पल्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

धोनीच्या आई-वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांची ऑक्सिजन पातळी चांगली आहे. कोरोनाचे संक्रमण फुप्फुसापर्यंत पोहचू शकलेले नाही, त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त होतील, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक! 24 तासात जवळपास 3 लाख रुग्ण, 2000 मृत्यू

झारखंडमध्ये कोरोनाचा कहर

झारखंडमध्ये मंगळवारी ४९६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे झारखंडमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७२ हजार ३१५ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी झारखंडमध्ये ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. झारखंडमधील १५४७ जण आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावले आहेत. सध्या तेथे ३३१७८ जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

रांचीमध्ये सर्वाधिक

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये सर्वाधिक १७०३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पूर्व सिंहभूममध्ये ६९२, पश्चिम सिंहभूममध्ये १६१, बोकारो १७८, चतरा ४६, देवघर ११६, धनबाद १७५, गुमला १४९, हजारीबाग १७७, जामताडा १३३, खुंटी २०३ कोडरमा २७९, साहेबगंज १२० आणि सिमडेगामध्ये १४३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

loading image