Ms Dhoni News: महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, IPS अधिकाऱ्याच्या शिक्षेला स्थगिती

Ms Dhoni News: माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या अपीलावर सुनावणी करण्यास सहमती दर्शवत न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने धोनीला हायकोर्टाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर नोटीस बजावली.
Ms Dhoni News:
Ms Dhoni News:

Ms Dhoni News:

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (5 फेब्रुवारी) मद्रास उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या अपीलावर सुनावणी करण्यास सहमती दर्शवत न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने धोनीला हायकोर्टाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर नोटीस बजावली.

धोनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर डिसेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयाने कुमारला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. धोनीने कुमारसह अनेक पक्षांविरुद्ध दाखल केलेल्या 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला हे प्रकरण आहे.

काय आहे प्रकरण -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2013 मध्ये धोनी बेटिंग आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे धोनीने अनेकांविरोधात मानहानीचा आरोप करत याचिका दाखल केली होती. ज्यात संपत कुमारचाही समावेश होता. खरे तर हे संपूर्ण प्रकरण आयपीएल मॅच फिक्सिंगशी संबंधित आहे. महेंद्रसिंग धोनीने 2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांच्या सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणाऱ्या कथित दुर्भावनापूर्ण विधानांमुळे उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Ms Dhoni News:
2026 FIFA World Cup : न्यूयॉर्कमध्ये रंगणार अजिंक्यपदाची लढत; २०२६ मधील फुटबॉल विश्‍वकरंडकाचे बिगुल वाजले

धोनीने मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले होते की संपत कुमारने आपल्या दाव्यांबाबत माफी मागितल्यास अवमानाचा खटला दाखल करण्यात मला स्वारस्य नाही, परंतु संपतने तसे करण्यास नकार दिला आहे.  (Latest Marathi News)

Ms Dhoni News:
World Cup U19 : नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य; भारत-आफ्रिका आज उपांत्य सामना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com