IPL 2019 : पुढील वर्षी तुला खेळताना बघू म्हटल्यावर धोनी म्हणाला...

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

सामना झाल्यानंतर संजय मांजरेकरने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुढील वर्षी तुला पुन्हा खेळताना बघू असे म्हटले. यावर धोनीने 'Hopefully yes' म्हणजेच मी खेळेन अशी आशा करुयात असे वक्तव्य केले. 

आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सामना झाल्यानंतर संजय मांजरेकरने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुढील वर्षी तुला पुन्हा खेळताना बघू असे म्हटले. यावर धोनीने 'Hopefully yes' म्हणजेच मी खेळेन अशी आशा करुयात असे वक्तव्य केले. 

त्याच्या या वाक्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या त्यामुळे पारडे सातत्याने बदलणाऱ्या... कमालीच्या चुरशीच्या सामन्यात मोक्याची वेळी वॉटसनने केलेली टोलेबाजी आणि त्याला मिळालेले जीवदान सामन्यात रंग भरणारी ठरली होती, परंतु 2013, 2015, 2017 आणि आता 2019 असे विषम अंकाचे वर्ष मुंबई इंडियन्ससाठी मात्र सुदैवी ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni reveals his future speaks about the season and World Cup