MS Dhoni | VIDEO : महेंद्रसिंह धोनीला एकच खंत! मला क्रिकेटच्या देवासारखं...

MS Dhoni Says I Realize I Can Not Paly Like Idol Sachin Tendulkar
MS Dhoni Says I Realize I Can Not Paly Like Idol Sachin Tendulkar ESAKAL

MS Dhoni Sachin Tendulkar Idol : महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा वनडे वर्ल्डकप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला होता. धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या आयपीएल खेळतोय. त्यामुळे त्याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. मात्र त्याची क्रेझ अजूनही तशीच आहे. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओ धोनीने आपण कोणाला क्रिकेटिंग आदर्श मानतो याचा खुलासा केला आहे.

MS Dhoni Says I Realize I Can Not Paly Like Idol Sachin Tendulkar
Prithvi Shaw : पृथ्वी भावाने केली पुन्हा एकदा हवा! 61 चेंडूत ठोकल्या 134 धावा!

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडिओथ महेंद्रसिंह धोनी म्हणतो की तो लहानपणापासून सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. धोनी म्हणाला की, 'माझ्यासाठी माझा क्रिकेटिंग आदर्श हा कायम सचिन तेंडुलकरच राहिला आहे. तुमच्या सारखा मी देखील सचिन तेंडुलकरसारखं खेळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यासारखं खेळू शकत नाही. मात्र मनापासून सचिनसारखं खेळण्याची इच्छा होती. लहानपणी तो माझा क्रिकेटिंग आदर्श होता.'

MS Dhoni Says I Realize I Can Not Paly Like Idol Sachin Tendulkar
VIDEO | NZ vs PAK : तुफान एक्सप्रेस! हारिसच्या वेगवान चेंडूने फिलिप्सच्या बॅटचे झाले तुकडे

धोनी 2023 आयपीएलमध्ये खेळणार

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 चा हंगाम खेळणार आहे. गेल्या हंगामात धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कर्णधारपद पुन्हा त्याच्याकडे आल्यानंतर आता तो 2023 चा आयपीएल हंगाम खेळणार आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राऊंड चिदंबरम स्टेडियमवर आपला शेवटचा आयपीएल सामना खेळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com