MS Dhoni Video : एअर होस्टेसने फ्लाइटमध्ये धोनीचा बनवला गुपचूप व्हिडिओ, पण लोक का संतापले?

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video
MS Dhoni Sleeping In Flight Viral Video

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video : महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून खुप लांब राहतो. तो प्रसिद्धीपासून दूर राहून साधे जीवन जगणे पसंत करतो. त्यामुळे त्यांचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर आला की तो वेगाने व्हायरल होतो. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये झोपलेला दिसत आहे.

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video
WI vs IND : ड्रेसिंग रूममध्ये चहलने रागात जडेजाला दाखवले डोळे! त्याने गाल ओढले अन्... Video

हा व्हिडिओ एअर होस्टेसने बनवला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी शेजारच्या सीटवर बसलेली दिसत आहे. साक्षी मोबाईलवर काहीतरी पाहत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

आता या व्हायरल व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोकांनी व्हिडिओवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक संतापले आहेत. खरं तर, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी धोनी आणि त्याच्या पत्नीच्या प्रायव्हसीमुळे एअर होस्टेसवर टीका केल्या.

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचा क्रिकेटशी ब्रेकअप! वेस्ट इंडिजहून परतताच संघाला ठोकला रामराम

नुकत्याच खेळलेल्या आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा चॅम्पियन बनवले. मात्र या स्पर्धेदरम्यान धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. स्पर्धेनंतर मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. सीएसके सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली. अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी साक्षीने धोनीबद्दल अपडेट देताना सांगितले की, तो बरा होत आहे, तो रिहॅबमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com