MS Dhoni | धोनीने झाडाखालच्या डॉक्टरकडून घेतले गुडघ्यावर उपचार

MS Dhoni Taking Treatment On Knee From Native Doctor Who Sit Under Tree
MS Dhoni Taking Treatment On Knee From Native Doctor Who Sit Under Tree esakal

रांची : चेन्नई सुपर किंग्जचा थलायवा महेंद्र सिंह धोनीला (MS Dhoni) काही दिवसांपासून गुडघेदुखीचा (Knee) त्रास सुरू झाला आहे. यावर उपचार घेण्यासाठी तो रांचीतील (Ranchi) एका डॉक्टरकडे गेला होता. विशेष म्हणजे रांचीतील एका ग्रामीण भागात असलेले हे डॉक्टर (Doctor) आपले रूग्ण झाडाखाली बसून तपातात. विद्या बंधन सिंह खारवार (Vidya Bandhan Kharwar) असे या डॉक्टरांचे नाव असून ते गेल्या 28 वर्षापासून रूग्णांवर उपचार करत आहेत. उपचार करत असलेल्या झाडाखालीच त्यांचा एक तंबू (Tent) आहे. या तंबूतच धोनी या डॉक्टरांना भेटला होता. धोनीवर उपचार करण्यासाठी या डॉक्टरने एका डोसचे फक्त 40 रूपये घेतले.

MS Dhoni Taking Treatment On Knee From Native Doctor Who Sit Under Tree
नीरज चोप्राची उत्कृष्ट कामगिरी, आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला

रांचीपासून जवळपास 70 किमी अंतरावर असणाऱ्या कटिंगकेला या लापूंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात डॉ. विद्या बंधन सिंह खारवार हे गेल्या 28 वर्षापासून रूग्णांवर उपचार करत आहेत. गेल्या महिन्यात या डॉक्टरांकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी आला होता. तो एक महिनाभर या झाडाखालच्या डॉक्टरांना भेटत होता. हे डॉक्टर हाडांवर उपचार करतात त्यांची औषधे घरी घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे त्या तंबूतच रूग्णांवर औषधोपचार केले जातात. धोनी या उपचारांसाठी दोन चार दिवसांच्या अंतराने महिनाभर

MS Dhoni Taking Treatment On Knee From Native Doctor Who Sit Under Tree
Jasprit Bumrah : अखेर ठरलं! जसप्रीत बुमराहच टीम इंडियाचं नेतृत्व करणार

धोनीच्या आधी या डॉक्टरांकडून त्याच्या पालकांनी देखील उपचार घेतले आहेत. विद्या बंधन सिंह खारवार यांनी सांगितले की पहिल्यांदा त्यांनी धोनीच्या पालकांना ओळखलेच नाही. याचबरोबर त्यांनी धोनीला देखील ओळखले नाही. ज्यावेळी शेजारील तरूण मुले त्याच्या भोवती गोळा होऊन फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे लागली त्यावेळी त्यांना धोनीच्या प्रसिद्धीबद्दल माहिती झाली.

विद्या म्हणाले, 'धोनी हा एखाद्या सामान्य रूग्णाप्रमाणे कोणताही गाजावाजा न करता आला. त्याला सेलिब्रेटी असल्याचा कोणताच गर्व नव्हता. आता प्रत्येक चार दिवसांनी धोनी आल्याची बातमी पसरत होती आणि धोनीचे चाहते दवाखान्याजवळ येत होते. त्यामुळे आता तो त्यांच्या गाडीत बसतो आणि त्याच्यावर औषधोपचार केले जातात.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com