MS Dhoni to Play IPL 2026 Season
esakal
महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्याप आयपीएल खेळत आहे. अशातच तो आयपीएलचा २०२६चा मोसमही तो खेळणार असल्याचे चेन्नई सुपरकिंग्स संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच धोनी खेळणार की नाही, या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.