...म्हणून जाँटी ऱ्होड्स बेस्ट असूनही शॉर्टलिस्ट झाले नाहीत : एमएसके प्रसाद

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

टीम इंडियासाठीच्या सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध जागांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जागेसाठी सर्वाधिक चर्चा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांना मात्र साधे शॉर्टलिस्टही करण्यात आले नाही. आता यामगचे कारण एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : टीम इंडियासाठीच्या सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध जागांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जागेसाठी सर्वाधिक चर्चा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांना मात्र साधे शॉर्टलिस्टही करण्यात आले नाही. आता यामगचे कारण एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

''आर श्रीधर हे सध्याच्या घडीली जगातील सर्वोत्तम क्षेत्ररश्रण प्रशिक्षक आहेत. त्यांनी भारतीय संघाची क्षेत्ररक्षण खूप सुधारली आहे. त्यांच्यामुळे भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळेच त्यांच्याशिवाय या जागेसाठी आम्ही कोणाचाच विचार करु शकत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही आम्ही जाँटीला संधी दिली नाही कारण या दोन्ही जागा भारत अ आणि राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीसाठी आहेत,'' असे स्पष्टीकरण प्रसाद यांनी दिले. 

बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविल्यावर जाँटी यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यांची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणना केली जाते आणि म्हणूनच श्रीधर यांना त्यांची कडवी स्पर्धा दिली असती. 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या समितीने ही प्रकिया पूर्ण केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यासह फिजिओ आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी प्रत्येकी तीन-तीन जणांचे शॉर्टलिस्ट करण्यात आले. या सर्वांमध्ये मार्क रामप्रकाश हे एकमेव परदेशी आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSK Prasad Reveals Why Jonty Rhodes Were Not Shortlisted For Not The Post Of Fielding Coach