आता फुटबॉल विश्वातही अंबानींची हवा; Liverpool क्लब करणार खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liverpool F.C.

आता फुटबॉल विश्वातही अंबानींची हवा; Liverpool क्लब करणार खरेदी

भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा क्रीडा व्यवसाय आता परदेशात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंबानी प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूल एफसी विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत. इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.

फेनवे स्पोर्ट्स ग्रुप (FSG), लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा सध्याचा मालक, ऑक्टोबर 2010 मध्ये मर्सीसाइड क्लब विकत घेतला होता. आता तो क्लब विकण्याचा विचार करत आहे. फुटबॉल क्लबच्या विक्रीसाठी अंबानी यांनी गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनले यांचीही मदत घेतली आहे.

हेही वाचा : गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

वृत्तसंस्था पीटीआयने ब्रिटीश दैनिक 'द मिरर'च्या हवाल्याने म्हटले आहे की, FSG लिव्हरपूल एफसीला 4 अब्ज डॉलर ब्रिटिश पौंडला विकू इच्छित आहेत. एफएसजीला लिव्हरपूल एफसीसाठी अनेक ऑफर मिळत आहेत, परंतु कंपनीने म्हटले आहे की, क्लबच्या हिताचे निर्णय कंपनी घेणार आहे. त्यामुळे कंपनी नवीन भागधारकांचा विचार करणार आहे.

मुकेश अंबानी यांच्याशिवाय आखाती आणि अमेरिकेतील अनेक उद्योगपती खरेदीदारांच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात आले आहे. Jurgen Klopp च्या संघाला FSG अंतर्गत भरपूर यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत प्रीमियर लीगचे विजेतेपद, चॅम्पियन्स लीग, एफए कप, काराबाओ कप आणि युरोपियन सुपर कप जिंकले आहेत.

हेही वाचा: Gujarat Election: मोदींच्या गुजरातमध्ये १८ गावातील लोकांचा निवडणुकीवर बहिष्कार; कारण...

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) अंबानी मुंबई इंडियन्सचे मालक आहेत. यासह, फुटबॉल स्पर्धा इंडियन सुपर लीग आयोजित करण्याव्यतिरिक्त, ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे व्यावसायिक भागीदार देखील आहे.