Mumbai Cricket Association: मुंबई क्रिकेट संघटनेचे पूरग्रस्तांसाठी एक कोटी
MCA Flood Relief: मुंबई क्रिकेट संघटनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिले आहेत. तसेच मुंबई क्रिकेटपटू एकत्रितपणे २५ लाख रुपये मदतीस देणार आहेत.
मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्य फंडला देण्याचा निर्णय घेतला आहे.