BCCI मुख्यालयात कोरोनाची एन्ट्री, MCA ऑफिसचं शटर डाउन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MCA and BCCI

BCCI मुख्यालयात कोरोनाची एन्ट्री, MCA ऑफिसचं शटर डाउन

मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) कोरोनामुळे कार्यालयाला टाळे लावण्याची वेळ आली आहे. कार्यालयातील 15 स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने तीन दिवस कार्यालय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्यालय दक्षिण मुंबईतील एकाच इमारतीमध्ये आहे. एमसीएचे कार्यलय ठप्प झाले असले तरी बीसीसीआय मुख्यालयातील कामकाज सुरुच आहे. पण कोरोना प्रोटोकॉलनुसार, मर्यादित क्षमतेनं कर्मचारी कार्यालयात येत आहेत.

हेही वाचा: AUS vs ENG : जॉनीची 'शानदार' सेंच्युरी; इंग्लंड 250 पार!

एमसीएच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 15 स्टाफ सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी पुढील तीन दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय कार्यालयातील काही मंडळींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पण कार्यालय बंद ठेवण्यासंदर्भातील कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर बीसीसीआय कार्यालयातील 90 टक्के मंडळी वर्क फ्रॉम होम आहेत. 10 टक्के लोकच कार्यालयात येऊन काम करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: त्याला कैद्यासारख ठेवलंय; जोकोविच्या आईचा अधिकाऱ्यांवर आरोप

शुक्रवारी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकड्यात 20,181 रुग्णांची भर पडली आहे. सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण असून, (Active Corona Cases In Mumbai) मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top