
Dewald Brevis : मुंबई इंडियन्सच्या बेबी एबीचा इंग्लंडमध्ये धमाका; चोपल्या 49 चेंडूत 112 धावा
लंडन : मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडूंचा ताफा सध्या इंग्लंडमध्ये पुढच्या आयपीएल हंगामाची तयारी करत आहे. मुंबई इंडियन्सने इंग्लंडमधील क्लब डरहम विरूद्ध सराव सामने खेळत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपल्या संघातील युवा भारतीय आणि काही विदेशी खेळाडूंना तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर घेऊन गेली आहे. इंग्लंडमध्ये हा युवा संघ रिलायन्स क्रिकेट टीमच्या नावाने सराव सामने (Practice Match) खेळत आहे. 22 जुलैला डरहस विरूद्ध झालेल्या सामन्यात रिलायन्स क्रिकेट टीमने 81 धावांनी विजय मिळवला. यात बेबी एबी (BABY AB) डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) धमाकेदार कामगिरी केले. त्याने 49 चेंडूत 112 धावांची धमाकेदार खेळी केली. यात 6 चौकार आणि 9 षटकार मारले.
हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजला पराभवानंतर मोठा धक्का, Jason Holder मालिके बाहेर
रिलायन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट गमावून 211 धावा केल्या. यानंतर डरहम क्रिकेट टीमला फक्त 130 धावात गुंडाळले. या सामन्यात अर्जुन तेंडुलकर देखील खेळला होता. त्याने 3 षटकात 27 धावा दिल्या.
हेही वाचा: World Athletics Championship : भालाफेकपटू अनु राणीचे पदक थोडक्यात हुकले
इंग्लंड दौऱ्यावर गेलेली युवा मुंबई इंडियन्स म्हणजेच रिलायन्स क्रिकेट टीमने सलग 8 सामने जिंकले. आयपीएलच्या 2022 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळात होती. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने काही खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर घेऊन गेले आहेत. या दौऱ्यावर हे खेळाडू मॅच प्रॅक्टिस करणार आहेत. मुंबई इंडियन्सने 2023 च्या हंगामाची सुरूवात आतापासूनच केली आहे. सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑफ सिजन सुरू आहे.
Web Title: Mumbai Indians Baby Ab Dewald Brevis Hit 49 Ball 112 Runs In Practice Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..