राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

State-Level Volleyball Championship : बदलापूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून मुंबई, लातूर, पुणे आणि कोल्हापूरच्या संघांनी विजयी सलामी दिली.
Chhatrapati Shivaji Maharaj State Volleyball Tournament

Chhatrapati Shivaji Maharaj State Volleyball Tournament

esakal

Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj Volleyball Cup 2026: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह कोल्‍हापूर, लातूरच्‍या संघानी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. १८ वर्षांखालील मुलांच्‍या गटात पुणे संघाने नाशिक विरूध्द चिवट झंुज देत विजय खेचून आणले. पुण्याच्‍या मुलींच्‍या दोन्‍ही संघाने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवित दिवस गाजवला. पुणे संघाच्‍या मुलींच्‍या दोन्‍ही संघाने विजयश्री प्राप्‍त केली. १८ वर्षांखालील मुलांच्‍या गटातील अटीतटीच्‍या लढतीत पुणे संघाने नाशिकचा २५-२०, २५-२१ गुणांनी पराभव करून गटात अव्‍वल स्‍थानावर झेप घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com