esakal | मुंबईचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, 'धवन T20 World Cup खेळणं कठीणच'
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

मुंबईचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, 'धवन T20 World Cup खेळणं कठीणच'

sakal_logo
By
विराज भागवत

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत शिखर धवनकडे भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व

मुंबई: T20 World Cup 2021 ला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद जरी भारताकडे असले तरी सर्व सामने हे युएई आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहेत. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2020 चा हंगामदेखील युएईमध्ये खेळवण्यात आला होता. या हंगामात शिखर धवनने सलग दोन सामन्यात दोन शतकं ठोकण्याचा विक्रम केला होता. मात्र, T20 World Cup 2021मध्ये शिखर धवनला संघात स्थान मिळणं कठीणच आहे, असं मत माजी मुंबईकर खेळाडू अजित आगरकरने व्यक्त केलं आहे. तो एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. (Mumbaikar Cricketer says Shikhar Dhawan has less chance in Team India for T20 World Cup 2021 than KL Rahul and Rohit Sharma)

हेही वाचा: इंग्लंडची 'विम्बल्डन फायनल' अन् मुंबई हायकोर्ट.. वाचा रंजक किस्सा

"शिखर धवन टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातून खेळेल की नाही हा खरंच कुतूहलाचा विषय आहे. राहुल आणि रोहित हे दोघे खूप चांगले सलामीवीर म्हणून खेळ करत असतात. त्यांनी धवनला मागे टाकलंय असं आपण म्हणतो. पण महत्त्वाचे म्हणजे, धवनदेखील कायम धावा करत राहतो आणि शर्यतीत आपणही आहोत असं सांगत सलामीवीराच्या पदावर दावा सांगतो. सध्या तो आपला खेळ दाखवू शकेल. पण श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील त्याच्या कामगिरीचा त्याला संघात निवड करून घेण्यासाठी किती फायदा होईल हे सांगणं अवघडच आहे", असं आगरकर म्हणाला.

Ajit-Agarakar

Ajit-Agarakar

हेही वाचा: Tokyo Olympics : स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची संपूर्ण यादी

"शिखर धवनने इंग्लंडविरूद्धचा पहिला टी२० सामना खेळला. त्यानंतर त्याला संघाबाहेर बसवण्यात आले. त्यानंतर वन डेमध्ये धवनने चांगली कामगिरी केली. IPLच्या दोन हंगामातदेखील त्याने उत्तम खेळ करून दाखवला. धवन सध्या काहीच चुका करत नाहीये. पण राहुलने इंग्लंडच्या मैदानावर चांगला खेळ केला आहे. त्यानंतर युएईच्या मैदानातही राहुलकडून चांगली कामगिरी झाली आहे. आणि रोहित हा तर उपकर्णधार आहे. अशा परिस्थितीत शिखर धवनचं इंग्लंडविरूद्ध संघात नसणं त्याच्यासाठी अधिक त्रासदायक असेल", असंही आगरकरने स्पष्ट केलं.

loading image