जोकोविचला हरवून नदाल अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

रोम - स्पेनच्या रॅफेल नदाल याने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोविच याचे आव्हान ७-६ (७-४), ६-३ असे परतावून लावले. नदालने ही स्पर्धा सात वेळा जिंकली आहे.

जोकोविचविरुद्ध त्याचा कस लागणे स्वाभाविक होते. पहिल्या सेटमध्ये त्याला टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले. दोन्ही खेळाडूंत दीर्घ रॅलींमध्ये ताकदवान फटक्‍यांचे प्रदर्शन झाले. त्यामुळे अनेक गुण नाट्यमय ठरले. या दोघांमधील ही ५१वी लढत होती. यात नदालने २५वा विजय मिळविला. जोकोविचने २६ वेळा बाजी मारली आहे.

Web Title: Nadal beat Djokovic in the final round