T20 World Cup: नामिबियाचा नेदरलँडवर विजय

ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीच्या सातव्या सामन्यात नामिबियाने नेदरलँडचा ६ विकेट्सने पराभव केला
T20 World Cup
T20 World Cupsakal media

आबुधाबी : ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीच्या सातव्या सामन्यात नामिबियाने नेदरलँडचा ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजीस उतरणाऱ्या नेदरलँड संघाने ४ विकेट गमावून नामिबियासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. नामिबियाने हे आव्हान १९ व्या षटकांतच पूर्ण केले. या विजयासह नामिबियाने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे; तर दुसरीकडे नेदरलँडचे स्पर्धेतील आव्हान मात्र आता संपुष्टात आल्यातच जमा आहे. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

सलामीला उतरलेल्या मॅक्स ओडोडने पहिल्या विकेटसाठी स्टीफन मायबर्ग (१६) सोबत ४२ धावांची भागीदारी करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, सहाव्या षटकात मायबर्ग आणि रुलोफ व्हॅन डर मर्वे (६) आठव्या षटकात बाद झाल्याने नेदरलँडला दुहेरी धक्का बसला.

त्यानंतर मॅक्स ओडोडने तिसऱ्या विकेटसाठी कॉलिन एकरमन (३५) सोबत ८२ धावा जोडल्या आणि यादरम्यान त्याने सलग दुसरे अर्धशतकही पूर्ण केले. मॅक्स ओडोडने ५६ चेंडूत ७० धावा केल्या. तर नंतर नामिबियाच्या डेव्हिड विसेने ४० चेंडूत ६६ धावांची बहारदार खेळी करत संघाचा विजय साकारला.

संक्षिप्त धावफलक

नेदरलँड २० षटकांत ४ बाद १६४ (मॅक्स ओडोड ७०-५६ चेंडू, ६ चौकार १ षटकार, कॉलिन एकरमन ३५-३२ चेंडू, १ चौकार १ षटकार, जॅन फ्रिलिंक २-३६, डेव्हिड विसे १-३२) पराभूत वि. विजयी नामिबिया १९ षटकांत ४ बाद १६६ (डेव्हिड विसे ६६-४० चेंडू, ४ चौकार ५ षटकार, गेरहार्ड इरास्मस ३२-२२ चेंडू, ४ चौकार व १ षटकार, पीटर सीलार १-८, फ्रेड क्लासेन १-१४).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com