नरिंदर बत्रांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Narinder Batra
Narinder Batraesakal
Summary

'मला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे.'

नवी दिल्ली : नरिंदर बत्रा (Narinder Batra) यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (Indian Olympic Association) अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. बत्रा 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे (FIH) अध्यक्ष झाले होते. हॉकी इंडिया (India Hockey Team) फंडाशी संबंधित 35 लाखांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं नरिंदर बत्रा यांच्याविरुद्ध गेल्या महिन्यात प्राथमिक चौकशी सुरू केली होती. बत्रा यांनी वैयक्तिक फायद्यासाठी हॉकी इंडियासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप आहे.

बत्रा यांनी एका निवेदनात म्हटलंय की, 'जागतिक हॉकी सध्या महत्त्वाच्या विकासाच्या टप्प्यातून जात आहे. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी, तसेच हॉकी स्पर्धेसाठी हॉकीच्या जाहिराती आणि इतर कार्यक्रमांवर अधिक वेळ घालवण्यासाठी मला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळंच मी आयओए अध्यक्षपदाचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतलाय.'

Narinder Batra
सैनिकांवर गोळीबार ते गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण; जाणून घ्या यासिनचं दहशतवादी कृत्य

बत्रा म्हणाले, 'मला वाटतं की आता ही भूमिका अशा व्यक्तीला देण्याची वेळ आलीय, जो भारतीय खेळाला नव्या कल्पनांनी पुढं नेईल. गेल्या चार वर्षांत ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचं मी आभार मानू इच्छितो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com