नरसिंग यादवने घेतली पंतप्रधानांची भेट

पीटीआय
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - उत्तेजक द्रव चाचणीत निर्दोष ठरल्यानंतर भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव याने आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे नरसिंग ऑलिंपिक स्पर्धेस अपात्र ठरणार, त्याच्यावर चार वर्षांची बंदी येणार असे वाटत असतानाच नरसिंग व त्याच्या टीमने सर्व चित्र फिरवत आपण निर्दोष असल्याचे सिद्ध केले. निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतर नरसिंगने आज सकाळी संसदेत जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर नरसिंग म्हणाला की, त्यांनी मला आशिर्वाद दिला आहे. अजून चांगली कामगिरी करण्याची शुभेच्छा देत तुमच्यासोबत अन्याय होणार नाही, असे सांगितले. 

नरसिंगने सोमवारी निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय कुस्ती महासंघ यांनी सर्वतोपरी साह्य केल्याचे सांगितले होते. आता रिओत पदक जिंकून हे सर्व ऋण फेडण्याचा प्रयत्न करेन, असे तो म्हणाला आहे.

Web Title: Narsingh Yadav meets PM Modi