Video : नॅथन लायनने या खास विकेसाठी 326 दिवस पाहिले वाट

वॉशिंग्टन सुंदरला बाद केल्यानंतर नॅथनल लायनला पहावी लागली ३२६ दिवस वाट
Nathan Lyon
Nathan Lyon esakal

ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा गाबा कसोटीत ( Gabba Test) 9 विकेट राखून पराभव केला. या विजयात ऑस्ट्रेलियाचा (Australia) फिरकीपटू नॅथन लायनने (Nathan Lyon) मोलाची भुमिका बजावली. त्याने सामन्याच्या चौथ्या दिवशी 4 विकेट घेत इंग्लंडच्या (England) फलंदाजीला मोठे भगदाड पाडले. या कमगिरीबरोबरच त्याने आपल्या कारकिर्दितला एक मोठा टप्पा पार केले. तो कसोटीत 400 विकेट (400 Test Wicket) घेणारा 17 वा खेळाडू ठरला. तर नॅथन लायन (Nathan Lyon) ऑस्ट्रेलियाचा 400 विकेट पूर्ण करणारा हा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राने कसोटीत 400 विकेटचा टप्पा पार केला होता.

Nathan Lyon
Ashes : भारताने जे करुन दाखवले ते इंग्लंडला जमलेच नाही!

मात्र नॅथन लायनला (Nathan Lyon) ही 400 वी कसोटी विकेट (400 Test Wicket) घेण्यासाठी तब्बल 326 दिवस वाट पहावी लागली होती. भारताविरुद्धच्या (Team India) कसोटी सामन्यात नॅथन लायनने आपली 399 वी विकेट घेतली होती. त्याने 11 महिन्यापूर्वी भारताच्या वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली होती. त्यानंतर आज अॅशेस कसोटी मालिकेत (Ashes Test Series) त्याने डेव्हिड मलानला ८२ धावांवर बाद करत त्याने आपली ४०० वी कसोटी (400 Test Wicket) शिकार साजरी केली.

Nathan Lyon
WTC Point Table : कांगारुंचे इंग्लंडला फटके, टीम इंडियाला बसले चटके

399 वरुन ४०० विकेटवर पोहचण्यासाठी कोणी किती घेतला वेळ?

जेम्स अँडरसन - ४ दिवस

डेल स्टेन - ७ दिवस

स्टुअर्ट ब्रॉड - ७६ दिवस

नॅथन लायन - ३२६ दिवस

Nathan Lyon
Cricket Record : एलेक्स कॅरीचा वर्ल्ड रेकॉर्ड, पंतला टाकलं मागे

ऑस्ट्रेलियाकडून (Australia) कसोटी क्रिकेटमध्ये (Cricket) सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत नॅथन लायन तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर शेन वॉर्न (Shane Warne) आहे. त्याने १४५ सामन्यात ७०८ विकेट घेतल्या आहेत. १२४ सामन्यात ५६३ विकेटे घेणारा ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ नॅथन लायनचा नंबर लोगतो. लायन हा २०११ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com