Nathan Lyon Record : नॅथन लॉयनची शेन वॉर्नच्या विश्वविक्रमाशी बरोबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nathan Lyon Record

Nathan Lyon Record: नॅथन लॉयनची शेन वॉर्नच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Nathan Lyon Record: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनने एक अनोखा विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार गोलंदाजी करत त्याने 5 बळी घेतल्या. त्याच्या पंजामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 212 धावांत गारद केले. कसोटी कारकिर्दीमध्ये लायनने वीस वेळा पाच विकेट घेतल्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २० किंवा त्याहून अधिक वेळा ५ बळी घेणारा लायन आता ऑस्ट्रेलियाचा ५वा गोलंदाज ठरला आहे. याआधी शेन वॉर्न (37), ग्लेन मॅकग्रा (29), डेनिस लिली (23) आणि क्लेरी ग्रिमेट (21) विकेट घेतल्या आहे.

हेही वाचा: Ind vs Eng: विराटकडून शतक नाही विजयात वाटा हवा : राहुल द्रविड

आशियाई खेळपट्टीवर नॅथन लायनने एका डावात 5 विकेट्स घेऊन शेन वॉर्नच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नने आशियामध्ये 9 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावात लायनने 25 षटकांत 90 धावांत 5 बळी घेतले.

लंकेविरुद्ध ५ विकेट्स घेऊन त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या बाबतीत लायन १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने सर रिचर्ड हॅडलीला मागे टाकले आहे. आता तो रंगना हेराथची बरोबरी करण्यापासून फक्त १ विकेट दूर आहे. कपिल देव यांच्या ४३४ विकेट्सचा टप्पाही तो लवकरच पार करेल. कपिलला मागे टाकल्यानंतर त्याचा कसोटी क्रिकेटमधील टॉप १० गोलंदाजांमध्ये समावेश होईल.

हेही वाचा: केएल राहुलने दिली आनंदाची बातमी, आता लवकरच...

ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत नॅथन लायन तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर शेन वॉर्न (Shane Warne) आहे. त्याने १४५ सामन्यात ७०८ विकेट घेतल्या आहेत. १२४ सामन्यात ५६३ विकेटे घेणारा ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ नॅथन लायनचा नंबर लोगतो. लायन हा २०११ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे.

Web Title: Nathan Lyon Shane Warne Massive World Record With Five Wicket Haul Lanka Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top