राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची आघाडीनंतर हार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - महाराष्ट्राच्या मुलींना राष्ट्रीय कुमार बास्केटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत पहिल्या सत्रातील आघाडीनंतर उत्तर प्रदेशविरुद्ध हार पत्करावी लागली. वैष्णवीच्या ५७ गुणांच्या धडाक्‍यामुळे महाराष्ट्रास ८३-९१ पराभव पत्करावा लागला. 

पहिल्या सत्रात चार गुणांची आघाडी घेणारा महाराष्ट्र दुसऱ्या सत्रात १२, तर तिसऱ्या सत्रात पाच गुणांनी मागे पडला. वैष्णवीने महाराष्ट्राचा बचाव सहज भेदला. त्यामुळे सुझान (१७) आणि नेहाचा (१३) प्रतिकार तोकडा पडला.

Web Title: national basketball competition