National Games 2022: 36 खेळ, 7000 एथलीट्स जाणून घ्या सर्व काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Games 2022

National Games 2022: 36 खेळ, 7000 एथलीट्स जाणून घ्या सर्व काही

National Games 2022 : राष्ट्रीय खेळ 2022 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4.30 वाजता उद्घाटन करणार आहे. यंदा ही स्पर्धा गुजरातमधील सहा शहरांमध्ये होणार आहे., तर अहमदाबादमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारी सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: Arshdeep Singh : अर्शदीपच्या कामगिरीवर पंजाब किंग्जची मालकीण फिदा

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी देशाच्या खेळाडूंना संबोधित करणार आहेत. गुजरात प्रथमच राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले आहे. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या राष्ट्रीय खेळांमध्ये सुमारे 7,000 खेळाडू 36 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. काही स्पर्धांना सुरुवात झाली आहे, तर शुक्रवारपासून अनेक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : अर्शदीप सिंग-दीपक चहरने सीनियर्सचे वाढवले टेन्शन, केला मोठा दावा!

भारतात राष्ट्रीय खेळ 2022 कधी सुरू होणार?

सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान टेबल टेनिस स्पर्धेने झाली आहे.

गुजरातमधील कोणती शहरे या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत?

गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये हे खेळ होणार आहेत. मात्र, ट्रॅक सायकलिंगचा कार्यक्रम दिल्लीतील वेलोड्रोम येथे होणार आहे.

गेल्या वेळी राष्ट्रीय खेळ कधी आयोजित करण्यात आले होते?

राष्ट्रीय खेळांची शेवटची आवृत्ती 2015 मध्ये केरळमध्ये झाली होती. गोव्याला 2016 मध्ये पुढील राष्ट्रीय खेळांचे आयोजन करायचे होते, परंतु काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला.

राष्ट्रीय खेळांच्या या आवृत्तीत काय कार्यक्रम आहेत?

28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 7000 खेळाडू तसेच भारतीय सशस्त्र दलातील क्रीडा संघही राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. एकूण 36 क्रीडा स्पर्धा आहेत.