National Games : तिरंदाज तेजल साळवेला मिळणार क्रीडा साहित्य

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून सव्वा पाच लाखांचा निधी मंजूर
national games 2023 archer Tejal Salve will get sports materials 5 lakh funding
national games 2023 archer Tejal Salve will get sports materials 5 lakh fundingSakal

जालना : राष्ट्रीय पातळीवर तिरंदाजी स्पर्धेत जिल्ह्याचे नाव उंचावणारी तेजल साळवे हिला अखेर जिल्हा प्रशासनाकडून क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाच लाख बारा हजारांचा निधी मंजूर केल्याचे बुधवारी (ता.आठ) ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे.

गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये जालन्याची तिरंदाज तेजल साळवे हिने कांस्य पदकाची कमाई केली होती. मराठवाड्यातून राष्ट्रीय पातळीवरील खेळामध्ये कांस्य पदक पटकावणारी तेजल ही पहिली तिरंदाज खेळाडू आहे.

याशिवाय तेजल साळवे हिने १८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेतही रौप्य पदक, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक, पहिल्या खेलो इंडिया तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक, १९ वी वरिष्ठ राज्य तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक,

शालेय राज्य चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक, २० वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक, सब ज्युनिअर महाराष्ट्र राज्य तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक, गुजरात येथील केवडिया वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियन स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्य पदक, संघात प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे.

असे असताना देखील जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून तेजलला तिरंदाजीचे क्रीडा साहित्य देण्यास टाळाटाळा केली जात होती. यासंदर्भात ‘तेजलला केवळ हारतुरे; साहित्याचा मात्र वानवा’ या मथळ्याखाली सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या वृत्ताची दखल घेत तेजल साळवे हिला तिरंदाज साहित्य खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून नावीन्य पूर्ण योजनेंतर्गत पाच लाख बारा हजारांचा निधी मंजूर केला आहे. शिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दर्जेदार साहित्य खरेदी करण्याचे निर्देशही दिले आहेत. हे क्रीडा साहित्य वेळेत खरेदी झाले तर तेजल साळवे या गुणवंत खेळाडूला पुढील स्पर्धेची तयारी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

तिरंदाज तेजल साळवे हिला क्रीडासाहित्य खरेदीसाठी पाच लाख बारा हजारांचा निधी मंजूर केला आहे. सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला पुढील आठ दिवसांमध्ये साहित्य खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

— डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com