National Kabaddi Tournament : नाशिकच्या मुलींच्या संघाची विजयी घोडदौड

National Kabaddi Tournament
National Kabaddi Tournamentesakal

सिन्नर : येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सिन्नरकरांना रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. दुसऱ्या दिवसापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये नाशिक मधील ‘रचना’ मुलींच्या संघाने आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली तर मुंबई मुंबई, पुणे पुरुष संघांनी मैदान गाजवले.

दुसऱ्या दिवशी सेंट्रल रेल्वे व बीपीटी मुंबई सामन्यात मुंबईने प्रथम पासून वर्चस्व राखले. मात्र अर्ध्या सामन्यानंतर दोन्ही संघ समसमान २२ गुण मिळवून लढत देत होते. मुंबईने शेवटच्या क्षणात सुपर टॅकलवर विजय मिळविला. भारत पेट्रोलियम मुंबई संघ विरुद्ध त्रिमूर्ती नाशिकच्या सामन्यात भारत पेट्रोलियमने 28 गुणांनी विजय मिळविला. प्रो कबड्डीतील रिशांक देवाडिया, निलेश शिंदे, रोहित राणा यांच्या बळावर भारत पेट्रोलियमने सहज मात दिली. मुंबईच्या आरबीआय संघाला बालवड पुणे संघाने सात गुणांनी मात दिली. तत्पूर्वी मुंबई बीपीटी संघाचा सह्याद्री सोबत सामना झाला. 47 गुण मिळवून मुंबईने विजय मिळविला. सह्याद्री मंचला 25 गुण कमावता आले. महिंद्रा अँड महिंद्रा व मुंबई पोलिस संघात चुरशीची लढत झाली. महिंद्रा संघाने १९ तर मुंबई पोलिस संघाला १८ गुण मिळाले. अवघ्या एका गुणाने मुंबई पोलिसांना पराभूत व्हावे लागले.

National Kabaddi Tournament
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचांय? दररोज शंख वाजवा

मुलींच्या गटात रचना नाशिकने विशाल स्पोर्ट मुंबई सोबत झालेल्या सामन्यात चुरशीची लढत दिली. शेवटच्या तीन मिनिटात अपेक्षा मोहितेने केलेल्या उत्कृष्ट पकडीच्या बळावर दोन गुण कमावून रचना नाशिकने विजय मिळवून दिला. नाशिक सहयोगनगर संघ व मुंबई डॉ. शिरोडकर संघात मुंबईने सहज विजय मिळविला. सहयोगला ६ तर मुंबई संघाला २० गुण मिळाले. दुसऱ्या दिवशी ६ हजार प्रेक्षकांनी कबड्डी सामन्यांचा आनंद लुटला. राजेश खुळे यांनी सामान्यांचे समालोचन केले.

National Kabaddi Tournament
Heart Attack: सकाळचा नाश्ता टाळल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो? वाचा काय सांगतो 'हा' रिपोर्ट

चौकट शुक्रवारी कबड्डीचे सामने संपल्यानंतर हास्यजत्रा मधील कलाकारांनी सिन्नरकरांचे मनोरंजन केले. यावेळी विविध हास्यविनोद हास्य नाटिका तसेच सदाबहार गीते यांची मेजवानी सिन्नरकरांसाठी सह्याद्री युवा मंच व कबड्डी असोसिएशन यांनी केली होती. सिन्नरचे आशुतोष शेलार यांनी आपल्या गायलेल्या सदाबहार मराठी गिते सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली.

National Kabaddi Tournament
Heart Attack Alert: हार्ट अटॅक आल्यास आधी काय करावे? तज्ज्ञांचा घरी करण्यायोग्य सल्ला वाचा

खेळाडूंनी करिअर म्हणून खेळाकडे पहावे : गमे

खेळात प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. कुणा एकाचा तरी पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करून यश मिळवण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. गमे यांच्या हस्ते वैयक्तिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी आयोजक उदय सांगळे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी गमे यांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com