Vidarbha and Kolhapur Teams Begin National Kho-Kho Championship with Convincing Victories : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दमदार सुरुवात करत पहिल्याच फेरीत विजय मिळवले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने लडाख व पंजाबचा पराभव करून गटात आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणावर प्रभावी विजय मिळवत चुरस निर्माण केली. विदर्भ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संघांनीही सलामीच्या सामन्यात शानदार विजय मिळवले. यंदा ही राष्ट्रीय स्पर्धा अल्टिमेट लीग पद्धतीने खेळवली जात असल्याने रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत.