Neeraj Chopra Advice Jasprit Bumrah : बुमराहला जर वेग वाढवायचा असेल तर... स्टार भालाफेकपटू नीरजने दिला मोलाचा सल्ला

Neeraj Chopra Advice Jasprit Bumrah
Neeraj Chopra Advice Jasprit Bumrahesakal

Neeraj Chopra Advice Jasprit Bumrah : ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताचा वेगवान जसप्रीत बुमराहला एक मैत्रीपूर्ण सल्ला दिला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना नीरजने हा बुमराहला हा सल्ला दिला. यावेळी नीरजने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकप फायनलचा सामना पाहण्याचा अनुभव कसा होता हे देखील सांगितले.

Neeraj Chopra Advice Jasprit Bumrah
Sam Curran : फलंदाजी करताना गॉगल घालून शायनिंग करणाऱ्या सॅम करनला विंडीजने चांगलंच चोपलं

नीरजने जसप्रीतला कोणता सल्ला दिला?

नीरज चोप्राने आपल्या भालाफेकमधील अनुभवानुसार जसप्रीत बुमराह आपल्या गोलंदाजीचा वेग कसा वाढवू शकतो हे सांगितले. नीरज चोप्रा म्हणाला की, 'मला जसप्रीत बुमराह खूप आवडतो. त्याची गोलंदाजीची शैली खूप वेगळी आहे. मला असं वाटतं की जर त्यानं त्याचा रन अप वाढवला तर तो अजून वेगाने गोलंदाजी करू शकेल.'

नीरज पुढे म्हणाला की, 'एक भालाफेपटू म्हणून आम्ही कायम गोलंदाज कशा प्रकारे आपला वेग वाढवू शकतो याची चर्चा करतो. जर बुमराहने अजून मागून आपला रन अप सुरू केला तर त्याचा अजून वेग वाढेल. मला त्याची स्टाईल खूप आवडते.'

Neeraj Chopra Advice Jasprit Bumrah
Shadab Khan Viral Video : पाकिस्तानात साधा स्ट्रेचर नाही! शादाब राखीव खेळाडूच्या पाठीवर बसून मैदानाबाहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com