Neeraj Chopra : जागतिक गोल्ड स्पर्धेमधून नीरज चोप्राची माघार ; दुखापतीचे कारण

जून महिन्यात पुन्हा ट्रॅकवर परतेन, असा विश्‍वास नीरजकडून पुढे व्यक्त करण्यात आला
Neeraj Chopra
Neeraj Choprasakal

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि यंदा मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे येत्या चार जून रोजी होणार असलेल्या फॅनी ब्लँकर्स कोएन गेम्स, जागतिक ॲथलेटिक्स काँटिनेंटल टूअर गोल्ड स्पर्धेमधून माघार घेतली आहे.

याबाबत नीरज याने स्वत:हून ट्विवर या सोशल माध्यमावर याबाबत माहिती दिली. जागतिक ॲथलेटिक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत नीरजने नुकतीच पहिल्या स्थानावरही झेप घेतली आहे.

नीरज सांगतो, काही दिवसांपूर्वी सराव करताना माझ्या स्नायूंवर ताण पडला. त्यानंतर वैद्यकीय मूल्यमापन केल्यानंतर मी व माझ्या टीमने पुढे ही दुखापत आणखी गंभीर होऊ नये याची काळजी घेतली. याच कारणामुळे काँटिनेंटल टूअर गेम्समध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. दुखापत हा प्रवासाचा एक भाग आहे. यामधून बाहेर येणे सोपे नाही, पण मी दुखापतीवर मात करीत आहे. जून महिन्यात पुन्हा ट्रॅकवर परतेन, असा विश्‍वास नीरजकडून पुढे व्यक्त करण्यात आला.

आशियाई अन्‌ पॅरिस ऑलिंपिकवर नजर

नीरज याने यंदा ५ मे रोजी झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर दूरवर भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. नीरजने गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे साहजिकच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व पॅरिस ऑलिंपिक या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्याच्याकडून पदक जिंकण्याच्या आशा आहे. नीरजनेही ९० मीटर भाला फेकण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com