दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) ने शुक्रवारी एक निवेदन पोस्ट केले आणि त्यात त्याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला NC Classis स्पर्धेसाठी आमंत्रण का दिले, यावर स्पष्टिकरण दिले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात भारताच्या २८ जणांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर अर्शदला दिलेल्या आमंत्रणावरून नीरजवर टीका झाली. पण, नीरजने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.