Neeraj Chopra: नीरज चोप्रा अंतिम शर्यतीसाठी पात्र; डायमंड लीग ; श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेचे आव्हान मात्र कायम
Neeraj Chopra Qualifies for Diamond League Final: नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन स्पर्धांतून १२ गुण मिळवत तो गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला.
नवी दिल्ली: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदाच्या डायमंड लीग मालिकेतील केवळ दोन स्पर्धांमध्ये सहभागी झाला असला तरी तो ५ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.