
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला. त्याने अचानक लग्न केल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. २७ वर्षीय नीरजने हिमानी मोर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
नीरजने सोशल मीडियावर लग्नातील काही फोटो शेअर करत सर्वांना याबाबत माहिती दिली होती. त्याच्या लग्नाबाबत फारसा गाजावाजाही झाला नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी नक्की आहे कोण आणि त्याचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. आता त्याच्या काकांनीच याबाबत खुलासा केला आहे.