World Championship : गोल्डन बॉय नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक, इतिहास रचणार?

पहिल्याच थ्रोमध्ये नीरज चोप्रा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला
Neeraj Chopra world championship
Neeraj Chopra world championshipsakal

Neeraj Chopra world athletics championship : भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्रा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोचला आहे. नीरज चोप्राला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. पहिल्याच थ्रोमध्ये तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. (Neeraj Chopra Javelin Throw qualifies for final with 88.39m throw in first attempt world athletics championship 2022)

फायनलमध्ये जाण्यासाठी पात्रता गुण 83.50 मीटर ठेवण्यात आली होती. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटरचे अंतर कापले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. वर्षातील हा त्याचा तिसरा सर्वोत्तम थ्रो आहे. झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेचने त्याच्यापाठोपाठ 85.23 मीटरसह फायलनमधील स्थान पक्के केले तो दुसरा खेळाडू ठरला. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजला आता रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची 19 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. फायनल रविवारी सकाळी होणार आहे.

नीरज चोप्राने फिनलँडमध्ये 89.30 मीटर भालाफेक करत रौप्य पदकाची कमाई केली होती. तसेच त्याने डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले होते. फायनलमध्ये त्याचे लक्ष्य हे 90 मीटरचा बेंचमार्क पार करण्याचे असेल. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा नक्कीच आहे. जर त्याने पदक जिंकले तर तो वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला देशातला पुरूष खेळाडू ठरेल. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज 2003 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com