नीरज चोप्राने सुवर्ण पदकासाठी सर्वात आवडत्या गोष्टीचा केला त्याग

नीरज चोप्राने फिटनेससाठी खायच्या टाळला 'या' गोष्टी
neeraj chopra like baklava turkish sweet but avoid to fitness
neeraj chopra like baklava turkish sweet but avoid to fitnessसकाळ

Neeraj Chopra Fitness : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा (World Athletics Championships) 15 जुलै ते 24 जुलै या दरम्यान अमेरिकेच्या ओरिगॉन येथे खेळवण्यात येणार आहे. भारताने आपला 22 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेला नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) देखील समावेश आहे. याचबरोबर काही अव्वल अॅथलिटवर देखील सर्वांची नजर असले.

भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा त्याच्या फिटनेस आणि प्रशिक्षणासाठी खूप कटिबद्ध आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की त्याला 'बकलावा' मिठाई (लोकप्रिय तुर्की मिठाईचा प्रकार) आवडते. ही मिठाई आवडत असतानाही तो खात नाही. चोप्रा म्हणाले की, मला बकलावा मिठाई आवडतात, परंतु मी फिटनेस आणि प्रशिक्षणात मध्ये तडजोड करत नाही, त्यामुळे आवडत असूनही तो या गोष्टींपासून दूर राहतो.

neeraj chopra like baklava turkish sweet but avoid to fitness
VIDEO : 'आप'चा खासदार हरभजनची 'राज्यसभा' इनिंग सुरू

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, मला बकलावा आणि गोड पदार्थ आवडतात पण जेव्हा जेव्हा या गोष्टी माझ्यासमोर येतात तेव्हा मी पाठ फिरवतो. खेळाडूंसाठी तंदुरुस्ती आणि प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण करत असताना सामान्य खाणे यात मोठा फरक आहे.

neeraj chopra like baklava turkish sweet but avoid to fitness
इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

चोप्रा लहानपणी व्हॉलीबॉल, कबड्डी आणि क्रिकेट सारखे खेळ खेळायचे पण भालाफेक सोडून इतर कोणत्याही खेळात करिअर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्रा म्हणाला, मी शाळेत असताना मजेसाठी व्हॉलीबॉल खेळायचो. मी कबड्डीही खेळलो आहे आणि इतरांप्रमाणे मीही क्रिकेट खेळलो आहे. पण स्टेडियममध्ये गेल्यावर मला भालाफेक करायला आवडायची.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com