World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Neeraj Chopra World Athletics Final qualification details : नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपल्या भालाफेकीच्या ताकदीची झलक दाखवली आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने केवळ एका प्रयत्नातच फायनलमध्ये धडक मारली. पहिल्याच प्रयत्नात त्याने ८४.८५ मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला.
NEERAJ CHOPRA QUALIFIES FOR WORLD ATHLETICS FINAL WITH 84.85M THROW

NEERAJ CHOPRA QUALIFIES FOR WORLD ATHLETICS FINAL WITH 84.85M THROW

esakal

Updated on

World Athletics Championships Tokyo2025 Neeraj Chopra vs Arshad Nadeem rivalry in javelin : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा टोकियोमध्ये सुरू असलेल्या जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. आज झालेल्या पात्रता स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात त्याने ८४.८५ मीटर भालाफेक करून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीत पात्रता निश्चित करण्यासाठी ८४.४० हे अंतर ठेवले गेले होते आणि नीरजने पहिल्याच प्रयत्नात ते पार केले. नीरजने २०२३ मध्ये बुडापेस्ट येथे सुवर्णपदक पटकावले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com