
नीरज चोप्राने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( World Athletics Championship) भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याने भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवला. या यशानंतर ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राने आपली पहिली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.(Neeraj chopra Reaction Video after winning silver medal in World Athletics Championships)
भालाफेक दरम्यान परिस्थिती चांगली नव्हती. वाऱ्याचा वेग खूप जास्त असताना, मी चांगली कामगिरी करेन असा मला विश्वास होता. मी निकालावर समाधानी आहे, मला आनंद आहे की मी माझ्या देशासाठी पदक जिंकू शकलो अशी भावना नीरज चोप्राने यावेळी व्यक्त केली.
तसेच, स्पर्धा खडतर होती, स्पर्धक चांगल्या सरासरीने मारा करत होते, ते आव्हानात्मक झाले. चौथ्या थ्रोवेळी हवा प्रतिकूल, स्नायूही दुखावला गेला त्यामुळे मागे पडलो अशी खंतही चौप्राने यावेळी व्यक्त केली.
नीरज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने 88.09 मीटर भालाफेक करत कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेनंतर नीरजने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, मी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे याचे दडपण माझ्यावर वाटले नाही. तिसऱ्या थ्रोनंतरही माझा स्वतःवर विश्वास होता. मी पुनरागमन केले आणि रौप्यपदक जिंकले, पण पुढच्यावेळी वेळी पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करेन असा दृढ विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.
तसेच, सुवर्ण पदक जिंकलेल्या अँडरसनचेही नीरजने यावेळी कौतुक केले. हे कदाचित सोपे वाटले असेल पण अँडरसनने 90 मीटर अंतर पार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असेल. 90 मीटरच्या वर अनेक चांगले थ्रो फेकत तो यावर्षी जागतिक आघाडीवर आहे. त्याने खूप मेहनत घेतली याचा मला आनंद आहे. हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. असे नीरज यावेळी म्हणाला.
स्पर्धा खडतर होती, स्पर्धक चांगल्या सरासरीने मारा करत होते, ते आव्हानात्मक झाले. मी आज खूप काही शिकलो. सुवर्ण पदकाची भूक कायम राहील. पण प्रत्येक वेळी आपल्याला सुवर्ण पदक मिळू शकत नाही यावर माझा विश्वास आहे. मी जे करू शकतो ते करेन, माझ्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करेन. असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.