Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय नीरज चोप्रा' सुवर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राचे आगामी डायमंड लीग या महत्त्वाच्या स्पर्धेने पुनरागमन
Neeraj Chopra
Neeraj Chopra sakal

Neeraj Chopra Lausanne Diamond League 2022 : टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक आणि जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) आगामी डायमंड लीग या महत्त्वाच्या स्पर्धेने पुनरागमन होणार आहे. दुखापतीमुळे त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून (Birmingham Commonwealth Games 2022) माघार घेतली होती; पण आता तो फिट झाला आहे. येत्या 25 व 26 ऑगस्ट रोजी लुसाने येथे ही स्पर्धा होणार आहे. नीरजसमोर आगामी स्पर्धेमध्ये खडतर आव्हान असणार आहे. झेक प्रजासत्ताकचा जाकूब वादलेच, त्रिनिदाद अँड टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट या खेळाडूंचाही त्या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. नीरजच्या कामगिरीवर या वेळी लक्ष असणार आहे.

Neeraj Chopra
FIFA Suspends AIFF : भारतीय फुटबॉल संघटनेची निवडणूक २ सप्टेंबरला

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. मात्र त्याने स्पर्धा पूर्ण करता यावी यासाठी मांडीला बँडेज बांधून भाला फेकला होता. अशा परिस्थितीही नीरजने 88.13 मीटर भाला फेक करत रौप्य पदकाची कमाई केली. पदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या दुखापतीबाबत सांगितले. याचवेळी तो ही दुखापत कितपत गंभीर आहे हे उद्या सकाळपर्यंत कळेल म्हणाला होता. आता राष्ट्रकुल स्पर्धेतून नीरजने माघार घेत्यानंतर त्याची दुखापत गंंभीर स्वरूपाची असल्याचे सिद्ध झाले.

Neeraj Chopra
Novak Djokovic US Open : जोकोविच अमेरिकन ओपनला मुकणार

नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात 90 मीटर मार्क पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याने याच वर्षी स्टोकहोम डायमंड लीग 2022 मध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम (National Record) मोडला. त्याने 89.94 मीटर भाला फेकला होता. त्यामुळे या हंगामात तो 90 मीटर मार्क पार करणार अशी आशा होती. मात्र दुखापतीमुळे नीरज चोप्रा बॅकफूटवर गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com