Neeraj Throws 86.18m to Clinch Gold in Front of Home Crowd; Yego, Pathirage Follow : भारताच्या भूमीवर पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेच्या आयोजनाचे आणि अव्वल स्थान कायम ठेवण्याचे दडपण तसेच ९० मीटरचे लक्ष्य अशी तारेवरची कसरत असतानाही भारताचा वंडर बॉय नीरज चोप्राने श्री कांतिरवा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि तमाम भारतीयांना आनंद साजरा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली.