NED vs BAN : कडवट नेदरलँडने दिला अजून एक मोठा धक्का; बांगलादेशचा पराभव मात्र गतविजेते इंग्रज पोहचले तळात

NED vs BAN
NED vs BAN esakal

NED vs BAN : दक्षिण आफ्रिकेला धक्का देणाऱ्या नेदरलँड्सने भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये अजून एक धक्का दिला. त्यांनी बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सने कर्णधार एडवर्डच्या 68 धावांच्या जोरावर 229 धावा केल्या होत्या. हे आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. त्यांचा संपूर्ण संघ 142 धावात गारद झाला. पॉल मीकेरेनने 4 विकेट्स घेत गोलंदाजीत चमक दाखवली.

नेदरलँडच्या या विजयामुळे त्यांनी गुणतालिकेत आठवे स्थान गाठले असून गतविजेते इंग्लंड दोन गुणांसह आता तळात गेले आहेत. बांगलादेशचेही 2 गुण आहेत मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे ते नवव्या स्थानावर आहेत. स

NED vs BAN
World Cup 2023 Point Table : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरूद्ध निसटता विजय; मात्र पॉईंट टेबलमध्ये फायदा झाला की नाही?

नेदरलँडने आज पुन्हा एकदा झुंजार खेळी करत कमबॅक कसा करायचा याचा धडा घालून दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडने विसली बार्रेसीने 41 धावांच्या खेळीच्या जोरावर 2 बाद 4 धावांवरून 2 बाद 63 धावांपर्यंत मजल मारली. मात्र बांगलादेशने पाठोपाठ दोन विकेट्स घेत त्यांची अवस्था 4 बाद 63 धावा अशी झाली.

मात्र त्यानंतर कर्णधार एडवर्डने पुन्हा एकदा डाव सावरत 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्याला सायब्रंटने 35 तर वॅन बीकने 23 धावांची साथ दिली. त्यामुळे नेदरलँडने बांगलादेशसमोर 229 धावांचे आव्हान उभे केले.

NED vs BAN
AUS vs NZ : न्यूझीलंडच्या मागे रन आऊटचं शुक्लकाष्ठ! नीशमची 'ती' दुसरी धाव अन् 2019 च्या आठवणी झाल्या ताज्या

यानंतर नेदरलँडने बांगलादेशचा निम्मा संघ 69 धावात गारद करत सामन्यावर आपली पकड निर्माण केली होती. बांगलादेशचा तारणहार अशी ओळख असलेला मुशफिकूर रहीम अवघी एक धाव करून बाद झाला. त्यामुळे बांगलादेश पराभावाच्या खाईत लोटला गेला. नेदरलँडच्या मीकेरेनने भेदक मारा करत बांगलादेशचे स्टार फलंदाज एका पाठोपाठ एक करून पॅव्हेलनियनमध्ये धाडले.

महम्मदुल्ला, मुस्तफिजूर रहमान यांनी शेवटी प्रतिकार करत प्रत्येकी 20 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेश शंभरी पार करू शकला. मात्र नेदरलँडने अखेर बांगलादेशचा डाव 141 धावात संपुष्टात आणला आणि वर्ल्डकपमधील आपल्या दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com