World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 साठी आणखी एका संघाची घोषणा! 'या' खेळाडूंना मिळाली संधी

icc cricket world cup 2023
icc cricket world cup 2023

Netherlands squad announced for ICC Cricket World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. आता या मेगा स्पर्धेसाठी सर्व संघांची घोषणा होत आहे. जिथे मंगळवारी टीम इंडियाने संघ जाहीर केला, तर बुधवारी कांगारू संघ म्हणजेच ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 15 संघांवर शिक्कामोर्तब केले.

आता गुरुवारी वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत पात्रता झालेल्या नेदरलँड संघाने आपला संघाची घोषणा केली आहे.

icc cricket world cup 2023
Team India Head Coach : राहुल द्रविडनंतर आशिष नेहरा होणार टीम इंडियाचा कोच?

नेदरलँड संघाने भारतीय भूमीवर 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. नेदरलँड्सच्या 15 सदस्यीय संघात रीलोफ व्हॅन डर मर्वे आणि कॉलिन अकरमन या अनुभवी जोडीचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू पात्रता फेरीत संघाचा भाग नव्हते, ज्यामध्ये नेदरलँड्सने दुसरे स्थान मिळवून आपले स्थान निश्चित केले. स्कॉट एडवर्ड्सला संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.

icc cricket world cup 2023
Team India Head Coach : राहुल द्रविडनंतर आशिष नेहरा होणार टीम इंडियाचा कोच?

2023 चा वर्ल्ड कप भारताच्या यजमानपदाखाली 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत खेळवला जाईल. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कप 2023 अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. भारतातील 10 शहरांमधील 10 मैदानांवर खेळवले जातील. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे यांचा समावेश आहे.

2023 वर्ल्ड कपसाठी नेदरलँड संघ -

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रीलोफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शारीझ अहमद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com