T20 World Cup : सेमी फायनलचे दोन संघ झाले 'फिक्स', टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand and England qualify for T20 World Cup

T20 World Cup : सेमी फायनलचे दोन संघ झाले 'फिक्स', भारत कोणाविरूद्ध खेळणार?

India Equaltion for Semi Finals T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत ग्रुप-1 मधुन इंग्लंड आणि न्यूझीलंड पोचले आहेत. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचे 7-7 गुण होते, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडने अव्वल स्थान पटकावले. जर तर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर तो उपांत्य फेरीत कोणत्या संघाविरूद्ध खेळणार?

हेही वाचा: ENG vs SL T20WC22 : इंग्लंडचा शेवटच्या षटकात विजय; लंकेने इंग्रजांना चांगलेच झुंजवले

टीम इंडियाने जर रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला, तर त्यांचा सामना निश्चितपणे इंग्लंडशी होईल. कारण गट 2 मधील अव्वल संघ गट 1 मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या अपसेटचा बळी ठरली, तर समीकरणे थोडी गुंतागुंतीची होतील.

हेही वाचा: END vs SL : इंग्लंडने विजय आणला खेचून; गतविजेता ऑस्ट्रेलिया मायदेशात सुपर 12 मध्येच गार

टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध जर पराभवाला सामोरे जावे लागले, तर सुपर-12 मध्ये 6 गुणांवर सहा गुणांवर समाधान मानावे लागेल. अशा परिस्थितीत भारत उपांत्य फेरीत जातो की नाही हे इतर संघांच्या निर्णयावर अवलंबून असेल. गट-2 मधील पहिला सामना रविवारी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने येथे विजय मिळवला तर ते 7 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील. जर का नेदरलँड्सने त्यांचा पराभव केला तर 5 गुण होतील. पराभवामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.

हेही वाचा: Ravichandran Ashwin IND vs ZIM : मंकडिंग करण्यात तरबेज असलेला अश्विन स्वतःवर वेळ आली तर मात्र...

त्याचवेळी दिवसाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला 6 गुण मिळतील, पण टीम इंडियाला येथे पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त फायदा होईल. कारण टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध हरली आणि बांगलादेशने पाकिस्तानला हरवले तरीही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. टीम इंडियाचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा चांगला आहे. दुसरीकडे पाकिस्तान जिंकल्यास भारताला स्पर्धेतून बाहेर फेकून देऊ शकतो.

एक समीकरण असेही बनत आहे की जर दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना गमावला तर बांगलादेश जिंकेल की पाकिस्तान जिंकेल हे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.