New Zealand Cricket | ऐतिहासिक निर्णय; महिला - पुरूष खेळाडूंना 'एकसमान' पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand Cricket Board Historic Decision Men Women Cricketer Will Get Equal Salary

New Zealand Cricket | ऐतिहासिक निर्णय; महिला - पुरूष खेळाडूंना 'एकसमान' पगार

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) आज एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. आता न्यूझीलंडच्या राष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना (Women Cricketer) पुरूषांबरोबर मॅच फी (Salary) मिळणार आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून हा निर्णय लागू होईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड, 6 मुख्य असोसिएशन आणि न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत 5 वर्षाच्या नव्या डीलवर सहमती झाली.

आता महिला आणि पुरूष खेळाडूंना (Men Cricket) वनडे सामना खेळताना एकसमान मॅच फी मिळणार आहे. एका सामन्याचे जवळपास 2 लाख रूपये खेळाडूला मिळतील. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपा, 1.25 लाख रूपये देण्यात येणार आहेत. याचबरोबर देशांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 86 हजार, 40 हजार आणि 28 हजार रूपये मिळतील.

हेही वाचा: Shreyas Iyer : मॅक्युलमची 'चाणक्य निती', एक इशारा अन् श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये

नव्या करारानुसार पुरूष क्रिकेटपटूंना एका कसोटी सामन्यासाठी 5 लाखापर्यंतची मॅच फी मिळणार आहे. नव्या करारानंतर आता प्रत्येक असोसिएशनच्या टॉप महिला खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्तीजास्त 9.5 लाख रूपये मिळतील. करारबद्ध होणाऱ्या महिला क्रिकेटपटूंची संख्या देखील 54 वरून 72 वर नेण्यात आली आहे. नव्या करारानंतर न्यूझीलंडची कर्णदार सोफी डिवाइनने प्रतिक्रिया दिली की, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये महिलांना देखील पुरूषांच्या बरोबरीने पैसे देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे युवा महिला खेळाडूंना आणि मुलींना प्रोत्साहन मिळले.

हेही वाचा: विराट कोहलीचा विक्रम मोडल्यावर बाबर आजमची धक्कादायक प्रतिक्रिया

नव्या करारानुसार खेळाडूंना जास्तीजास्त 2.5 कोटी मिळणार

नव्या करारानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पुरूष खेळाडूंना जास्तीजास्ज 2.5 कोटी रूपये मिळणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड व्हाईट यांनी सांगितले की, यासारख्या महत्वाच्या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी खेळाडू आणि मुख्य असोसिएशनचे धन्यवाद याचबरोबर त्यांचे अभिनंदन. खेळासाठी हा सर्वात महत्वपूर्ण करार आहे.

भारतात पुरूष - महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी तफावत

भारतीय क्रिकेटचा (Indian Cricket) विचार केला तर इथे पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी तफावत दिसून येते. बीसीसीआय (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत संघटना आहे. पुरूषांच्या केंद्रीय कराराचा विचार केला तर एका खेळाडूला जास्तीजास्त 7 कोटी रूपये मिळतात. तर महिलांमध्ये केंद्रीय कराराअंतर्गत 50 लाख रूपये मिळतात. म्हणजे महिला आणि पुरूष यांना मिळणाऱ्या मानधनात 14 पटीचे अंतर आहे.

Web Title: New Zealand Cricket Board Historic Decision Men Women Cricketer Will Get Equal Salary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..