विराट कोहलीचा विक्रम मोडल्यावर बाबर आजमची धक्कादायक प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

babar azam breaking another virat kohli record t20

विराट कोहलीचा विक्रम मोडल्यावर बाबर आजमची धक्कादायक प्रतिक्रिया

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची तुलना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमशी केली जाते. बाबर आझमने अलीकडेच विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे, ज्यामध्ये तो टी-20 क्रमवारीत सर्वाधिक दिवसापासून नंबर-1 फलंदाज बनला आहे. बाबर आझमला पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.(babar azam breaking another virat kohli record t20)

हेही वाचा: एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडकडून भारतीय प्रेक्षकांना वर्णद्वेशावरून टिप्पणी

विराट कोहलीचा आणखी एक मोठा विक्रम मोडल्याच्या प्रश्नावर बाबर आझमने मोठी प्रतिक्रिया दिली. बाबर आझमला माहित पण नव्हते त्याने कोहलीचा कोणता विक्रम मोडला. पत्रकाराने सांगितल्यानंतर बाबर आझमला रेकॉर्डची माहिती झाली. त्यावर बोलताना बाबर म्हणाला की, मी खूप मेहनत करत आहे. त्यामुळेच मी इतकी चांगली कामगिरी करू शकलो आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद: ब्रिजभूषण यांचा शरद पवारांना आणखी एक दणका

ICC क्रमवारीत बाबर आझम टी-20 मध्ये नंबर 1 फलंदाज कायम आहे. यासह, बाबरने आता सर्वात जास्त काळ ICC टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. टी-20 क्रमवारीत सर्वाधिक दिवस नंबर-1 वर राहण्याचा विक्रम यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर होता. तो 1013 दिवस पहिल्या क्रमांकावर राहिला होता. तर बाबर गेल्या 1030 दिवसांपासून अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा: कोविडमधून बरे झाल्यानंतर Rohit Sharma नेटमध्ये गाळत आहे घाम - पाहा Video

विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून शतकाची वाट पाहत असताना बाबर आझम सातत्याने उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा करत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बाबर आझमने चांगली कामगिरी केली होती. आता पाकिस्तानच्या नजरा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर लागल्या आहेत. येथे 16 जुलैपासून कसोटी सामना सुरू होणार आहे, तर दुसरा कसोटी सामना 24 जुलै रोजी होणार आहे.

Web Title: Babar Azam Breaking Another Virat Kohli Record T20 India Vs Pakistan Icc Bcci

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..