IPL-Style T20 Tournament from 2027
esakal
भारतातील आयपीएलच्या यशानंतर जगभरातील क्रिकेट मंडळांकडून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने बिग बॅश, इंग्लंडने द हंड्रेड, बांग्लादेशने बीपीएल, दक्षिण आफ्रिकेने एसए२० आणि पाकिस्तानने पीएसएल या स्पर्धा सुरु केल्या आहेत. नवोदित खेळाडूंना संधी देणं हा यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे आता न्यूझीलंडने त्यांची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सुद्धा आयपीएल प्रमाणेच यशस्वी होईल, असा विश्वास न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला आहे.