esakal | BAN vs NZ : बांगलादेशसमोर न्यूझीलंडचीही नाचक्की!
sakal

बोलून बातमी शोधा

BAN vs NZ

BAN vs NZ : बांगलादेशसमोर न्यूझीलंडचीही नाचक्की!

sakal_logo
By
सुशांत जाधव

New Zealand tour of Bangladesh 2021 : कांगारुंची हवा काढणाऱ्या बांगलादेशनं घरच्या मैदानावर न्यूझीलंडचाही धुव्वा उडवलाय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 60 धावांत आटोपला. ढाका येथील शेर ए बांग्ला स्टेडियमवर पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. टॉम ब्लुण्डेल आणि रचिन रविंद्र यांनी न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली.

पदार्पणाचा सामना खेळणारा रविंद्र पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विल यंगने अवघ्या 5 धावांची भर घालून तंबूचा रस्ता पकडला. कर्णधार लॅथमच्या 18 आणि हॅन्री निकोलच्या 18 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी न्यूझीलंडचा संघ 16.5 षटकात 60 धावांत गारद झाला.

हेही वाचा: BCCI नं राखली मर्जी; टीम इंडियाला मिळाला नवा भिडू पण...

टी-20 सामन्यात बांगलादेश विरुद्ध खेळताना न्यूझीलंडनं केलेली आतापर्यंतची निच्चांक धावसंख्या आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा न्यूझीलंडचा संघ 60 धावांवर आटोपला आहे. यापूर्वी 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 60 धावांत आटोपला होता. 2019 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर चांगलीच नामुष्की ओढावली होती.

हेही वाचा: कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट

इंग्लंडने अवघ्या 45 धावांत कॅरेबियन संघाला गारद केले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील ही निच्चांकी धावसंख्या आहे. लाजीरवाण्या कामगिरीच्या यादीत न्यूझीलंड आता दुसऱ्या स्थानाव आहे. 2018 मध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजच्या संघाला 60 धावांत आटोपले होते. यात ऑस्ट्रेलियन संघाचाही समावेश आहे. बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 62 डावात आटोपला होता.

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. धावफलकावर अवघी एक धाव असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर मोहम्मद नइम बाद झाला. लिटन दासही याच षटकात एक धाव करुन तंबूत परतला. शाकिब अल हसनने 2 चौकाराच्या मदतीने 33 चेंडूत 25 धावा केल्या. तो माघारी फिरल्यानंतर मुशफिकुर रहिम 16 आणि कर्णधार मोहम्मदुल्लाह 14 धावा करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

loading image
go to top