Video: बांगलादेशने कहरच केला! असा DRS कोण घेतो का?

Bangladesh DRS Video
Bangladesh DRS Videoesakal
Updated on

बांगलादेशचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. पहिल्याच कसोटीत बांगलादेशने यजमान न्यूझीलंडच्या नाकात दम केला. बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये ( New Zealand vs Bangladesh) दमदार कामगिरी करणे कोणाला उपेक्षित नव्हते. मात्र बांगलादेशने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. मात्र सध्या बांगलादेशच्या या दमदार कामगिरीची चर्चा होण्याऐवजी त्यांनी घेतलेल्या एका अतार्किक रिव्ह्यूची (DRS) जोरदार चर्चा होत आहे. (Bangladesh DRS Video)

Bangladesh DRS Video
रहाणे-पुजारा जोडी जमली; दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे आघाडी

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत न्यूझींलडचा डाव सुरु होता. बांगलादेशचा गोलंदाज टस्किन अहमद (Taskin Ahmed) ३७ वे षटक टाकत होता. टस्किनने न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) एक चेंडू टाकला. पॅडच्या दिशेने येणारा हा चेंडू टेलरने आडवला. मात्र टस्किनने अति आत्मविश्वास दाखवत कर्णधाराला यावर डीआरएस घेण्यास सांगितले. कर्णधार मोमिनुल हकने (Mominul Haque) रिव्ह्यू (DRS) घेतला. मात्र या रिव्ह्यूमध्ये चेंडू रॉस टेलरने बॅटने आडवला होता. चेंडू पॅडवर लागण्याचा दुरान्वये संबंध नव्हता.

Bangladesh DRS Video
रहाणे, पुजाराचे भवितव्य गोलंदजांच्या हातात?

बांगलादेशने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३२८ धावांना प्रत्युत्त देताना पहिल्या डावात ४५८ धावांचा डोंगर उभारला होता. बांगलादेशकडून कर्णधार मोमिनुलने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. तर महमद्दुल हसन जॉयने ७८ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. विकेट किपर लिटन दासनेही ८६ धावांचे मोठे योगदान देत बांगलादेशला ३५० च्या पार पोहचवले. बांगलादेशने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर बांगलादेशने न्यूझीलंडची दुसऱ्या डावात ५ बाद १४७ अशी अवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com